श्री नरसिंहसरस्वाति स्वामी दत्त महाराज (datta maharaj)

श्री नरसिंहसरस्वाति स्वामी दत्ता महाराज (datta maharaj)

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज (datta maharaj) हे अत्यंत शांत आणि सौम्य अशा स्वभाव प्रकृतीचे . तेज हे कधी शीतल असत नाही मात्र महाराजांच्या बाबतीत हे निश्चित आहे . भक्तांना सांभाळून घेणारे आणि अभिष्ट देणारे महाराज कधी क्रोधीत झाले असतील का ?? किंवा होत असतील का ??

संपूर्ण गुरुचरित्रात केवळ एका गोष्टीकरिता त्यांचा हा क्रोध दिसून येतो . भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी या बिरुदांना महाराज नित्य सांभाळतात तेव्हा दत्त भक्तांना त्रास देणाऱ्या अभक्तांना या क्रोधाला सामोरे जावे लागते . अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आणि दत्त माहात्म्यात आली आहेत .

गुरुचरित्रात याची सुरुवात वल्लभेशाच्या कथेपासून होते . वल्लभेशाला चोरांनी मारले मात्र , तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज (datta maharaj) एका हातात त्रिशूल आणि एका हातात खट्वांग घेऊन प्रकट झाले . अत्यंत आक्रमक आणि क्रोधाने व्याप्त . चोरांनी विचारही केला नसेल तोवर त्यांचा वध झाला . तिसरा चोर मात्र अतिभाग्यवान ,पटकन पुढे होत महाराजांचे पाय धरले आणि क्षमायाचना केली . शरणागत वत्सल अशा दत्त महाराजांनी त्याच्या नमस्काराला मान देत जीवदान दिले .

शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीला त्रास देणाऱ्या पिशाच्चाला महाराज रागावून म्हणाले ,कस्त्वं पिशाचरूपेण सतीं खेदयसे S धम ll अरे अधमा (नीचा ),त्या सतीला कष्ट देणारा तू कोण आहेस ?? (व्दिसाहस्री )

गाणगापूरला एका ओस घरापाशी एक ब्रह्मराक्षस राहत असे . महाक्रूर या शब्दात त्याचे वर्णन आहे ,मनुष्यमात्राना आहार मानणारा तो महाराज तिथे जाताच प्रकट झाला . कर जोडोनि श्रीगुरुसी l विनवीतसे भक्तीसी l स्वामी माते तारी दीनासी ll महाराजांच्या क्रोधाला जाणणारा तो आधीच शरण येऊन मुक्ती प्राप्त करता झाला .

दोन मदोन्मत्त ब्राह्मण महाराजांपाशी वादविवाद करण्यासाठी आले . दत्त महाराजांना ओळखू शकले नाहीत आणि वादविवाद करा म्हणू लागले . मात्र महाराज त्यांच्या वादविवादाने क्रोधीत झाले नाहीत तर त्रिविक्रम यतिंना पायी चालवून हे दोघे पालखीत बसून आले. यतीश्वरा चालवूनी l आपण बैसले सुखासनी ll खेरीज अनेक ब्राह्मणाची निंदा केली . तेव्हा या अपराधाबद्दल महाराजांनी या मदोन्मत्त विप्राना शिक्षा केली . त्रिविक्रम यति हे महाराजांचे परमभक्त होते तेव्हा त्यांना दिलेला त्रास महाराजांना कसा चालेल ?

दत्त माहात्म्यात देखील अनेक प्रसंगात महाराजांचे भक्त वत्सलत्व दिसून येते . आयु राजा हा महाराजांचा भक्त ,त्याच्या मुलाकरिता अर्थात नहुषाकरिता महाराज स्वतः मूळ स्वरूपात प्राण रक्षणार्थ हजर होते .

दत्त महाराज (datta maharaj) हे आपल्या भक्तांचा नित्य सांभाळ करतात . भक्त म्हणून आश्वस्त होऊन हाक मारणे हे आपले कर्तव्य आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!

अशाच नवीन माहिती साठी भेट द्या आपल्या पेज ला आणि सगळ्यांन सोबत share करा खाली दिलेला माधम्यांतून तुम्ही लोकांना share करू शकता धन्यवाद !